logo

वर्षभरात १०६४ मुलांची सुटका मध्य रेल्वे आरपीएफच्या ऑपरेशन नन्हे फरिश्तेची यशस्वी कामगिरी

मुंबई, दि. ८ : प्रतिनिधी
मध्य रेल्वे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ)ने 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि इतर फ्रंटलाईन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने १,०६४ मुलांची मध्य रेल्वेवरील विविध स्थानकातून सुटका केली आहे. यामध्ये भुसावळ विभागातून सर्वात जास्त म्हणजे ३१३ मुलांची सुटका करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे यात चाईल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन झालेल्या मुला-मुलींचा समावेश आहे.
काही भांडण किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणाऱ्या मुलांना प्रशिक्षित आरपीएफ जवानांकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. सदर कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

विभागनिहाय सुटका करण्यात आलेली मुले
- भुसावळ : ३१३ मुले
- मुंबई : ३१२ मुले
- पुणे : २१० मुले
- नागपूर - १५४ मुले
- सोलापूर : ७५ मुले

6
3152 views